पैठण, (प्रतिनिधी): तिर्थक्षेत्र, श्रीक्षेत्र देवभुमी, दक्षिण काशी, नाथनगरी अशा अनेक परंपरेने नटलेली ही नगरी ह्या नगरीत आता पुन्हा वैभवात भर म्हणून नाथ नगरीत श्री दंडवत स्वामी महाराजांचे भव्य दिव्य स्मृती स्थानाची स्थापना होणार आहे, असे प्रतिपादन हभप विलास महाराज मोरे यांनी केले.
आपल्या भारत देशामध्ये भिन्न भिन्न संप्रदाय पंथ आहेत. त्या मध्ये महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा सर्वात मोठा संप्रदाय आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज व निळोबाराय हे पंच प्राण आहेत. श्री संत एकनाथ महाराजांचे शिष्य नित्यानंद नाथ हे अंजणगाव सुर्जीचे, श्रीधर आळंदीचे, नरहरी दशपुरचे व दंडवत स्वामी हे मुळ कर्नाटकचे आणि गावबा कावसानकर या पैकी दंडवत स्वामीचे मुळ नाव माधव त्र्यंबक शाळीग्राम हरितस गोत्री होते. त्यांचे शिष्य केशव स्वामी यांनी नाथांचे चरित्र लिहिले व पुढे परंपरा चालवली.
यामध्ये नारायण महाराज, व्यंकट महाराज, रामचंद्र महाराज, धर्मराज व गणेशाश्रम स्वामी, त्र्यंबक बाबा (राजाभाऊ) गणेश, अनंत, प्रभाकर आणि आता वर्तमान काळात दंडवत स्वामींचे वंशज अमृत महाराज ही परंपरा चालवतात ते नाथांचे चरित्र ग्रंथ प्रकाशित करणार आहेत असे ते प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले. पैठण येथे मी श्री दंडवत स्वामींचे स्मृती स्थान स्थापित करण्यात येणार आहे. या प्रसंगी जगदिश मुंदडा, संगित क्षेत्रातील जगदीश आचार्य, रायभान देवराव गरजे, पैठण शहर व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष योगीराज बुंदिले, रामेश्वर मुंदडा, दत्तात्रय पोहेकर गुरुजी यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.